गृहमंत्री अमित शहांकडून शरद पवार आणि सोनिया गांधींना ‘आव्हान’ ? म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रातोरात सत्ता स्थापन करून भाजपाने जनतेला आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्व राजकीय घडामोडींचे समीकरणं बदलून ‘मी पुन्हा येईन’ या आपल्या विधानास खरं केलं होतं. परंतु हा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि अवघ्या साडेतीन दिवसात भाजपा सरकार पडले. त्यामुळे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले आहेत. जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं असून विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे असे त्यांनी म्हटले असून शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला नाही.

नरेंद्र मोदींचे फोटो लावून शिवसेनेनं मतं मागितली असून उद्धव ठाकरेंनीही तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला. तसेच, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधींनाही शहांनी आव्हान दिलंय. तुम्ही केलेली आघाडी म्हणजे घोडेबाजार असल्याचा आरोपही शहांनी केलाय. एका माध्यमाशी बोलताना अमित शहा म्हणाले की, विरोधक आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करत होते परंतु घोडेबाजार आम्ही नाही तर तुम्ही करतात असे सांगत आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवलं नाही, आमदारांना हॉटेलवर ठेवून एकमेकांशी हातमिळवणी करुन सरकार तुम्ही बनविले. संपूर्णपणे वेगळ्या विचारधारेचे हे तीन पक्ष एकत्र आले आहेत.

आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला पण मुख्यमंत्रिपद देऊन आघाडीने सरकार बनविले, पद देऊन सरकार बनविणे हा घोडेबाजार नाही का? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला अमित शहांनी संतापजनक प्रतिक्रिया देत सांगितले की ‘जशी आमची युती होती, तशीच त्यांचीही आघाडी होती. आमच्यावर आरोप केले जातात की, आम्ही घोडेबाजार करतोय. परंतु तुम्ही दुसरे तिसरे काय केले, एक-दोन घोडे सोडा, तुम्ही शिवसेनाच्या घोड्यांचा पूर्ण तबेलाच चोरी केलाय.

मुख्यमंत्री पद देऊन तुम्ही शिवसेनेच्या ५४ घोड्यांचा तबेलाच चोरलाय. यामध्येसुद्धा घोडेबाजार झालाच ना, असा सवाल शहांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्रीपद दिलंय असंच नाही केलं हे. हा खरेदी व्यवहार नाही का, पदाची लालच व्यवहार होत नाही का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व शिवसेनेचं समर्थन असं समजा. मी शरद पवार आणि सोनिया गांधींना आव्हान देतो की, जर हा घोडेबाजार नाही तर दोन्ही पक्षांचे मिळून १०० च्या जवळपास जागा होतायंत.

तुमची आघाडी आहे, मग मुख्यमंत्री तुमचा बनवा, शिवसेनेचा नाही? त्यामुळेच हा घोडेबाजार आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.’ अमित शहांच्या या टीकेला शरद पवार आणि सोनिया गांधी काय उत्तर देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com