Vidhan Sabha Elections | बिगुल वाजला! मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

नवी दिल्ली : Vidhan Sabha Elections | लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत ( Vidhan Sabha Elections). छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुक आयोगाने आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. (Mizoram Chhattisgarh Madhya Pradesh Rajasthan Telangana Vidhan Sabha)

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना म्हटले की, आयोगाने पाच राज्यांचा दौरा करून येथील सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली. ( Vidhan Sabha Elections)

मिझारोमचा कार्यकाळ २०२३ रोजी संपत आहे. तर अन्य चार राज्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे.
या ५ राज्यात विधानसभेच्या ६७९ जागा असून १६.१४ कोटीहून जास्त मतदार आहेत. यात ८.२ कोटी पुरुष तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. पाच राज्यांमध्ये ६० लाख नवमतदार आहेत, जे प्रथमच मतदान करतील.

मतदानाची पूर्वतयारी म्हणून १७ ऑक्टोबरपासून मतदार यादी जारी केली जाईल. १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत
मतदार यादीत मतदाराला दुरुस्ती करता येईल. ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ असतील.
मतदान केंद्र २ किमी अंतरातच असेल. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जाणार आहेत.

पाच राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम

मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकुण २३० जागा असून ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होईल.

राजस्थान
राजस्थानात विधानसभेच्या एकूण २०० जागा असून २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होईल.

छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

तेलंगणा
तेलंगणामध्ये विधानसभेच्या एकूण ११९ जागा असून ३० नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

मिझोराम
मिझोराममध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागांसाठी निवडणूक होत असून ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदना होईल.

निवडणुकीचा निकाल
सर्व ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पीपीपी तत्वावर क्रेडिट नोटच्या बदल्यात महामंदवाडी आणि मुंढव्यातील रस्ते विकसित होणार; पुणे महापालिकेने 170 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या

MNS chief Raj Thackeray | ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेमध्ये टोलनाक्यावरुन फडणवीस आणि अजित पवारांची केली पोलखोल

Pune Crime News | पैशासाठी ठरलेले लग्न मोडले, पुण्यातील पोलीस भावा-बहिणींवर FIR

Pune Pimpri Chinchwad Fire News | पुण्यात टँकरला लागलेल्या भीषण आगीनंतर हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांमध्ये घबराट