मित्राच्या घरी ‘ओली’ पार्टी, पत्नीवर ‘बलात्कार’, त्यानं विरोध केल्यानंतर ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील विदिशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील आलमपुर गावामध्ये दोन मित्रांनी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बलात्काराला विरोध केला असता त्यांनी मित्राचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दिलेल्या जबाबावरून दोन जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सुरु आहे. तसेच महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

दारू पिऊन पत्नीवर बलात्कार –

सनील कुशवाह आणि मनोज अहिरवार हे दोघेजण आपल्या मित्राच्या घरी दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिघांनी मिळून दारू पिली. त्यानंतर दोघांची नजर मित्राच्या पत्नीवर पडली असता त्यांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली. तसेच मित्राचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना या घटनेची माहिती देऊन या आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.

Visit : Policenama.com