Vidyadhar Karmarkar | ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’.. विद्याधर करमरकर यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Vidyadhar Karmarkar | ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या वाक्यांचा सुर फक्त दिवाळीला बघायला मिळतो. या जाहीरातीमधील आजोबा अर्थात ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर Vidyadhar Karmarkar (आबा) यांचे दुःखद निधन (Died) झाले आहे. ते 96 वर्षाचे होते. 20 सप्टेंबर रोजी करमरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे.

विद्याधर करमरकर (Vidyadhar Karmarkar) हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक जाहिराती साकारल्या आहेत. करमरकर मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. प्रांरभी काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली होती.
वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते नेहमी सहभागी व्हायचे
. त्यामध्ये अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते.
तसेच कधी दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्यांनी साकारली होती.

विद्याधर करमरकर (आबा) यांनी कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया, सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स ,एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्याचबरोबर मोती साबण,
इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट या जाहिरातीत
देखील त्यांनी काम केले आहे.

 

Web Title : Vidyadhar Karmarkar | moti soap actor vidyadhar karmarkar passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

GMC Solapur Recruitment 2021 | सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ

MVA vs BJP | ‘भाजप-मविआ’मध्ये आरोपांचे राजकीय शीतयुद्ध; फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार ‘महाविकास’ सरकार बाहेर काढणार?