‘या’ IPS अधिकार्‍यानं केला होता विरप्पनचा ‘एन्काऊंटर’, अमित शहांनी दिली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा एन्काऊंटर करणाऱ्या आयपीएस अधिकारी विजय कुमार यांची गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू काश्मीर बाबतचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी ते जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार होते. विजय कुमार हे तमिळनाडूच्या केडरचे 1975 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जाणून घेऊयात त्यांनी नेमका कसा केला वीरप्पनचा एन्काऊंटर…

वीरप्पनची होती दहशत
तमिळनाडू आणि कर्नाटकाच्या जंगलांमध्ये वीरप्पनने मोठा हैदोस माजवला होता. पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नव्हती. वीरप्पनने अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आणि जवानांना देखील मारले होते. तेव्हाच विजय कुमार यांना याबाबत कारवाई करण्यासाठी पाठवण्यात आले.

Veerappan

एन्काऊंटर वेळी STF मध्ये होते विजय कुमार
1998 – 2001 मध्ये विजय कुमार काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये बीएसएफचे इन्स्पेक्टर जनरल होते. तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती. 2004 मध्ये ज्यावेळी त्यांनी वीरप्पनचा एन्काऊंटर केला त्यावेळी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यावेळी विजय कुमार एसटीएफ इंचार्ज होते.

नक्षलवाद्यांचा देखील केला नायनाट
2010 मध्ये छत्तीसगढ मध्ये सीआरपीएफच्या 75 जवानांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा विजय कुमार यांना सीआरपीएफचे डीजी बनवण्यात आले होते. जेणेकरून नक्षलवादी कारवायांना आळा बसेल.

तीन दशकांपर्यंत चालला वीरप्पनचा दहशतवाद
दक्षिण भारतातील हत्तीच्या दातांपासून ते चंदनाच्या झाडांची तस्करी वीरप्पन करत असे. वीरप्पनच्या दृष्टीवर परिणाम झाला होता आणि त्याला यावर इलाज देखील करायचा होता. याबाबत वीरप्पनने देखील एक डील केली होती आणि यातूनच त्याला बंदुका देखील हव्या होत्या.

पुस्तकात केला आहे सविस्तर उल्लेख
विजय कुमार ने ‘वीरप्पन : चेसिंग द ब्रिगॅंड’ या आपल्या पुस्तकात वीरप्पनच्या एन्काऊंटरची सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबतच वीरप्पन द्वारा केलेल्या सर्व हत्यांचा आणि अपहरणाचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे. त्यामध्ये अभिनेता राजकुमाराला 108 दिवसांपर्यंत अपहरण करून डांबून ठेवले होते.

वीरप्पनला पकडण्याबाबतचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याचे देखील विजय कुमार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. एकदा तर वीरप्पन एका पालीमुळे वाचला होता. एका ठिकाणी जात असताना वीरप्पनच्या अंगावर पाल पडली आणि त्याने जाणे रद्द केले. नेमके त्याच ठिकाणी पोलीस त्याची वाट पाहत होते.

व्यापाऱ्यालाच बनवला मोहरा
विजय कुमार यांनी प्लॅनिंग करून एका व्यवसायिकाला मोहरा बनवले. ज्याच्याकडून वीरप्पन हत्यारे घेत होता. ज्यावेळी ‘तुझे श्रीलंका कनेक्शन उघड होईल’, असे व्यवसायिकाला सांगण्यात आले त्यावेळी तो हात मिळवणीसाठी पोलिसांसोबत तयार झाला.

उपचारासाठी चालला होता
व्यापाऱ्याने वीरप्पनच्या डोळ्यांचा इलाज करण्यासाठीची पूर्ण व्यवस्था केली. यानंतर वीरप्पन हत्यारे आणि इतर गोष्टींसाठी श्रीलंकेला जाणार होता आणि डील झाल्यानंतर पुन्हा भारतात येणार होता.

SI वेल्लादुरई यांना केले ‘संदेश वाहक’
व्यापाऱ्यांचा संदेश वीरप्पनपर्यंत पोहचवण्यासाठी SI वेल्लादुरईची निवड केली आणि पूर्ण संभाषण कोडवर्ड मध्ये होणार असल्याचे सांगितले. एसटीएफने व्यापाऱ्याला सांगितले, तुम्ही वीरप्पनच्या माणसाला धर्मपुरीच्या एका चहाच्या दुकानात भेटा. यानंतर त्या माणसाने एका लॉटरी तिकिटाचे दोन तुकडे केले. एक व्यापाऱ्याला दिले आणि दुसरा तुकडा डोळ्यांचा इलाज करणाऱ्या माणसाला दिला.

वीरप्पन गोळीबारात ठार
तामिळनाडूच्या जंगलातून जेव्हा SI वेल्लादुरई रुग्णवाहिकेतून वीरप्पनला घेऊन चालले होते. तेव्हाच एसटीएफने त्याला चारही बाजूंनी घेरले. SI तेथून पळून गेले त्यानंतर झालेल्या गोळीबारात वीरप्पन ठार झाला.

Visit : Policenama.com