Vinayak Mete Death Case | शिक्रापूरदरम्यान विनायक मेटेंच्या कारचा पाठलाग करणारी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Mete Death Case | शिवसंग्रामचे अध्यक्ष (Shiv Sangram President) विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरुन शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने मेटे यांच्या मृत्यूपूर्वी 3 ऑगस्टच्या रात्री विनायक मेटे (Vinayak Mete Death Case) यांच्या कारचा पाठलाग झाल्याचा दावा केला होता. यामुळे विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

विनायक मेटे यांच्या कारचा शिक्रापूरदरम्यान (Shikrapur) पाठलाग करणारी कार रांजणगाव पोलिसांनी (Pune Rural Police) ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये चालकासह 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. 3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या एका कार्यकर्त्यासह पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले होते. Vinayak Mete Death Case)

 

यासंदर्भात रांजणगाव पोलीस ठाण्याचे (Ranjangaon Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे (Senior Police Inspector Balwant Mandge) यांनी सांगितले की, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली असून गाडीचा मालक आणि चालक संदीप वीर (Sandeep Veer) याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. कारमधील सहापैकी एकाचा वाढदिवस असल्याने ते शिरुरला गेले होते. त्यांचे नातेवाईकदेखील शिरुरमध्ये आले होते, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे. 3 ऑगस्ट रोजी मेटे यांच्या कारचा पाठलाग करण्यात आला होता.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth)
यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी (CID Investigation) करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

Web Title :- Vinayak Mete Death Case | police seized one car which followed vinayak metes car on 3rd august

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Ganeshotsav-2022 | पुणे शहर काँग्रेसच्या वतीने ‘देशाच्या स्वातंत्र्यावरील देखावा’ स्पर्धेचे आयोजन\

 

Modi Government | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 3 लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

 

Pune Ganesh Utsav 2022 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी