Pune Ganeshotsav-2022 | पुणे शहर काँग्रेसच्या वतीने ‘देशाच्या स्वातंत्र्यावरील देखावा’ स्पर्धेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav-2022 | देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (District Congress Committee) यंदाच्या  गणेशोत्सवामध्ये ‘देशाच्या स्वातंत्र्यावरील देखावा’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. (Pune Ganeshotsav-2022)

 

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. याच पुण्यामध्ये इंग्रजांविरूध्द लढताना सर्वांनी एकत्र यावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav-2022) सुरूवात करण्यात आली. गेली 127 वर्षे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुणे हे देशातच नव्हे तर जगामध्ये उत्सवाचे केंद्र बिंदू झाले आहे. याच पुण्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्याला अनेक विचारवंतांनी मार्गदर्शन केले. या सर्वांना अभिवादन म्हणून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गणेशोत्सवामध्ये देखावा स्पर्धाआयोजित करण्यात आला आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळांनी केलेला दि. 31 ऑगस्ट ते दि. 9 सप्टेंबर 2022 यामधील ‘देशाच्या स्वातंत्र्यावरील देखाव्यांतना’ पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्र. 25 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय  क्र. 15 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, तृतीय क्र. 10 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ 5 बक्षिसे व सर्व सहभागी मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.

 

सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे दि. 22 ऑगस्ट 2022 पासून संपर्क साधावा.
अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde)
यांनी पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Ganeshotsav-2022 | On behalf of the Pune City Congress, organization of the ‘View on the Independence of the Country’ competition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Modi Government | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 3 लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

 

Pune Ganesh Utsav 2022 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी

 

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर