देशातील ‘हे’ ‘दिग्गज’ पराभूत, तर ‘या’ दिग्गजांचा ‘दणदणीत’ विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत देशातील अनेक दिग्गजांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तर अनेक दिग्गजांनी आपला गड राखला आहे. काही दिग्गजांना दणदणीत विजय मिळाला तर काही दिग्गजांना परभावाचा दणका बसला आहे.

देशातील ५४२ पैकी ३४० जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. काही ठिकाणचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्य़क्ष राहूल गांधी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दणदणीत विजय मिळाला. राहूल गांधींना वायनाडमधून विक्रमी मतांनी विजय मिळाला तर बालेकिल्ला अमेठीत मात्र त्यांना पराभवाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमध्ये अडवाणींपेक्षा जास्त मतांनी विजय मिळाला आहे.

हे आहेत विजयी दिग्गज
नरेंद्र मोदी- वारणसी, अमित शहा – गांधीनगर, राहूल गांधी (वायनाड), आझम खान (रामपूर), अभिषेक बॅनर्जी (डायमंड हार्बर, प. बंगाल), अनुराग ठाकूर (हमीरपूर, हिमाचल प्रदेश), फारुख अब्दूल्ला (जम्मू काश्मीर), सुप्रीया सुळे (बारामती),

पराभवाच्या छाय़ेत
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(नांदेड), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), निरहूआ(आझमगड), ज्योतिरादित्य शिंदे(गुना), जयंत चौधरी (बागपत)