…म्हणून ‘ट्रोल’ झाली आराध्या अभिषेक बच्चन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियाच्या युगात ट्रोलिंग हा सर्वात मोठा ट्रेंड बनला आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार्स सर्वाधिक बळी ठरतात. या ट्रोलिंगमध्ये स्टार्स जास्त मेकअप करण्यापासून ते विना मेकअपपर्यंत आणि आपल्या ड्रेसपासून ते आपल्या हातात ग्लास घेण्यापर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीत ट्रोल होत असतात. आता सेलिब्रिटींची मुलंही या ट्रोलिंगला बळी पडत आहेत. यावेळी युजरने ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हीला ट्रोल आहे.

अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचा ८ वा वाढदिवस साजरा झाला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टारही दिसले. अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेली ही पार्टी पूर्णपणे खासगी होती. या पार्टीमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारी आराध्या आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याचे कारण आराध्याचे मेकअप आहे.

या पार्टीतला एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या जाइंट व्हिलमध्ये बसलेले दिसत आहेत. इतक्या लहान वयात मेकअप करण्यामुळे आराध्याचा हा फोटो ट्रोल होत आहे. इन्स्टाग्रामवर, बर्‍याच युजर्सने आराध्याने मेकअप केल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘त्यांची मुलगी खूप लहान आहे आणि तिला मेकअप करण्याची आवश्यकता नाही हे त्यांना ठाऊक नाही का?’

आराध्या आणि ऐश्वर्या ट्रोल झाल्याची ही पहिली वेळ नाही. प्रत्येक कार्यक्रमात आईला चिकटून राहिलेली आराध्या आणि आपल्या मुलीचा हात न सोडणारी ऐश्वर्याही मुलीसाठी ओव्हरप्रोटेक्टिव्ह असल्यामुळे ट्रोल झाली आहे.

ऐश्वर्या नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात आपल्या मुलीसोबत फिरत असते आणि आराध्या मीडियाच्या कॅमेऱ्यात पोज देताना दिसत आहे. या दोघींना यासाठी देखील ट्रोल होत असतात.

Visit : Policenama.com