दुर्दैवी ! जावयाची मिशी कापून घातली चप्पलांची ‘माळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका युवकाचे अपहरण करुन त्याला चप्पलांची माळ घालून त्याची आर्धी मिशी काढून आणि मधून केस कापण्यात आले. मानवतेला काळीमा फासरणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी हे प्रकरणं गंभीर्याने घेऊन तपास सुरु केला आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील आमेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आमेट पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश कुमार खटीक म्हणाले, 14 मार्चला दिलीप नाथ यांनी तक्रार दाखल केली की माझे अपहरण केले गेले होते. दिलीप नाथ यांची सामाजिक परंपरेनुसार पारसी नावाच्या मुलीशी काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता जिला त्याने नंतर सोडले होते. थोड्या दिवसांनी नाथ यांना पुन्हा त्या महिलेप्रती प्रेम निर्माण झाले. त्यानंतर तो पारसीला आपल्या घरी घेऊन आला आणि 8 मार्चला पारसीला आपल्या घरी थांबवून घेतले.

ही माहिती पारसीच्या कुटूंबियांना आणि नातेवाईकांना कळाली त्यानंतर ते तेथे पोहोचले. त्यांनी तेथे जाऊन दिलीप नाथ यांचे मुंडन केले आणि आर्धी मिशी कापली. तसेच गळ्यात चपलांची माळ घातली. असा एक व्हिडिओ आता शेअर होत आहे.

पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्यता पाहून दिलीप नाथची तक्रार दाखल करुन घेतली आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले. ज्यात प्रभुनाथ, देवनाथ आणि भीखनाथ यांचा समावेश आहे. तर चार आरोपी फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की पारसीचे सासर पालीमध्ये आहे. तिला 15 दिवसांपूर्वी दिलीप नाथ पळवून घरी घेऊन आला होता.