Virat Kohli | तमिळनाडूतील ‘त्या’ हत्येच्या प्रकरणात होत आहे विराट कोहलीच्या अटकेची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राग हा माणसाचा अत्यंत वाईट शत्रू आहे. माणसाला एकदा राग आला कि तो रागाच्या भरात काय करेल याचा काही नेम नाही. काहीवेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हा देखील घडतो. तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) अशी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धर्मराज (Dharmraj) नावाच्या व्यक्तीनं आपल्या मित्राचा (विघ्नेश) खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) माजी कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) फॅन आहे तर मृत व्यक्ती सध्याचा कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॅन आहे. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) अटक करा, असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल (Trend Goes Viral) होत आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
तमिळनाडूतील मल्लूरमधील पी. विघ्नेश (P. Vighnesh) आणि धर्मराज (Dharmraj) नावाचे दोन मित्र मंगळवारी रात्री सिडको इंडस्ट्रियल इस्टेटजवळ (CIDCO Industrial Estate) दारू पित क्रिकेटवर चर्चा करत होते.  यापैकी धर्मराज हा क्रिकेटपटू विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) (RCB) या आयपीएल (IPL) टीमचा चाहता आहे. तर, पी. विघ्नेश रोहित शर्माचा चाहता होता. त्यांच्या या चर्चेचे रूपांतर वादात झाले. यानंतर हा वाद विकोपाला जाऊन धर्मराजने विघ्नेशच्या अंगावर दारूची बाटली आणि क्रिकेटच्या बॅटने जोरदार हल्ला केला. या घटनेत विघ्नेशचा जागीच मृत्यू (Murder) झाला. त्यानंतर आरोपी धर्मराज घटनास्थळावरून पळून गेला.

धर्मराज बोलताना अडखळत बोलतो. त्याच्या या सवयीमुळे विघ्नेश त्याची कायम खिल्ली उडवत होता.
हि घटना घडली तेव्हा धर्मराज आणि विघ्नेश क्रिकेटबद्दल चर्चा करत होते.
या वेळी विघ्नेशनं धर्मराजची तुलना विराट कोहली आणि आरसीबी टीमचा कामगिरीशी केली.
या गोष्टीचा राग आल्याने धर्मराजने विघ्नेशचा खून केला. या घटनेनंतर रोहित शर्माच्या फॅन्सनी सोशल मीडियावर ‘अरेस्ट कोहली’ (Arrest Kohli) हा हॅशटॅग सुरू केला. या गोष्टीला विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॅन्सनी जोरदार विरोध केला. या घटनेमुळे अनेक ठिकाणी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी विघ्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Virat Kohli | demand for virat kohlis arrest in tamil nadu murder case is on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा