भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर विश्वजीत कदमांचा मोठा खुलासा ; म्हणाले..

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला. त्यानंतर आता अंतर्गत नाराजीला सुरुवात झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यात आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये जाणार याच्या चर्चा होत होत्या. मात्र त्यावर स्वतः विश्वजीत कदम यांनी खुलासा केला आहे.

मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भविष्यातही मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असं खुलासा विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. विश्वजीत कदमांच्या या खुलास्यामुळे सध्या त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थंडावल्या आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रावादीचे काही आमदार भाजपला गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भीतीही व्यक्त केली आहे. भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कमीत कमी आमदार जातील याकडे लक्ष ठेवून आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, २०१९च्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यासाठी भाजप आतापासूनच काँग्रेस राष्ट्रावादीच्या आमदारांवर आताच गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केलेत. लोकसभा निवडणुकीतही भाजपने अशी खेळी केली होती. त्यामुळे तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत वापरण्याची शक्यता आहे.