Diet tips : ‘या’ 8 गोष्टींमध्ये संत्र्यापेक्षा जास्त Vitamin-C, इम्युन पावर वाढवून शरीराला बनवतील मजबूत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस महामारीच्या काळात इम्युनिटी सिस्टम मजबूत ठेवण्याची जास्त आवश्यकता आहे. योग्य डाएटसह व्हिटॅमिन सी यासाठी आवश्यक आहे. संत्र्यात सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. वय 19 ते 64 दरम्यान असलेल्यांना रोज 40 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सीची गरज असते.

व्हिटॅमिन सी चे स्त्रोत
1 पपई
एका पपईमध्ये 88.3 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. यामुळे सायनस साफ होते. हाडे मजबूत होतात.

2 स्ट्रॉबेरी
एक कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 87.4 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. यामुळे हृदय निरोगी राहते. दात स्वच्छ राहतात.

3 कोबी
कोबीचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने 5 ग्रॅम फायबर आणि 5 ग्रॅम प्रोटीनसह 127.7 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. बद्धकोष्ठता, हाडे मजबूतीसाठी उपयोगी आहे.

4 अननस
अननसमध्ये 78.9 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.

5 ब्रोकली
ब्रोकलीत 132 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. यामुळे हृदय निरोगी राहते. कॅन्सरचा धोका कमी होतो.

6 आंबा
एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे 122.3 मिलीग्रॅम विटामिन सी असते.

7 लाल शिमला मिरची
शंभर ग्रॅम लाल शिमला मिरचीत सुमारे 127.7 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.

8 ब्रसेल्स स्प्राउट्स
ब्रसेल्स स्प्राउट्सच्या एका सर्व्हिंगमध्ये सुमारे 74.8 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.