फायद्याची गोष्ट ! Jio ला टक्कर देण्यासाठी Vodafone ची ‘भन्नाट’ ऑफर, दर दिवशी मिळणार ‘दुप्पट’ डेटा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वोडाफोन-आयडिया कंपनीने ग्राहकांना परवडणाऱ्या अशा तीन ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांपेक्षा दुप्पट फायदा मिळवून देणाऱ्या आहेत असा दावा वोडाफोन-आयडिया कंपनीने केला आहे. या सर्व ऑफर्स मध्ये १.५ जीबी अधिकचा डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. जाणून घेऊया त्या ऑफर्स…

१) २४९ रुपयांची ऑफर
२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या ऑफर मध्ये ग्राहकांना प्रतिदिवस ३ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, प्रीमियर अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना कमी पैशात चांगल्या सेवा देण्याचा आमचा मानस असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

२) ३९९ रुपयांची ऑफर
५६ दिवसांची वैधता असणाऱ्या या ऑफर मध्ये ग्राहकांना प्रतिदिवस ३ जीबी डेटा मिळणार आहे. या सोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिवस १०० SMS ची सेवाही उपलब्ध आहे. या सोबतच वोडाफोन प्ले, Zee5 अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

३) ५९९ रुपयांची ऑफर
वोडाफोन ग्राहकांसाठी सर्वात उत्तम अशी हि ऑफर असून या मध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. प्रतिदिवस ३ जीबी डेटा मिळणार आहे तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवशी १०० SMS उपलब्ध होणार आहे. कंपनी कडून प्रीमियर अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन ही मिळणार आहे.