मतदार माझ्या पाठीशी, मी नव्हे जनता निवडणूक लढवतेय : किसन कथोरे

मुरबाड (अरुण ठाकरे) : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड विधानसभेत ही चवथी निवडणूक लढवत असताना विक्रमी मताने निवडून येणार असे आमदार किसन कथोरे म्हणाले. मतदार राज्या माझ्या पाठीशी आहे मी निवडणूक लढवीत नसून जनताच लढवीत आहे. मतदार मोठ्या मताधिक्याने विक्रम करणार आहे. मतदारांचा आशीर्वाद हाच खरा निर्धार असून, राष्ट्रवादी आहे कुठं हेच शोधावे लागेल, आपला विजय होईल हे त्यांना एखाद्या चांगल्या नसलेल्या दिवशी स्वप्न पडलं असेल असा मिश्कील टोला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज धसई येथे प्रचार फेरीत दिला.

भाजप-सेना-रिपाइं महायुतीचे मुरबाड विधानसभेचे उमेदवार किसन कथोरे यांच्या निवडणूक प्रचाराची मोठी रॅली फटाक्यांच्या आतिषबाजीत आज मुरबाड तालुक्यातील धसई येथे वाजत गाजत निघाली होती. संपूर्ण धसई गाव व परिसरात मोठ्या उत्साहात या प्रचार पायी रॅलीची सुरुवात झाली. मतदार असणाऱ्या अनेक भगिनींनी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचे औक्षण करून त्यांना प्रचंड विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तर मुरबाड मतदार संघातील जनतेचा मोठा पाठिंबा असून महाराष्ट्र विक्रमी मताधिक्याने निवडीत येणार असल्याचे भाजपचे युवा नेता राजेश पाटील यांनी पोलीस नामा रिपोर्टर अरुण ठाकरे यांच्याशी बोलताना सांगितले.

वाजत गाजत निघालेल्या या प्रचार रॅलीत धसई जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाचे सदस्य, तालुका कार्यकर्ते व स्थानीक सेना- भाजपच्या कार्यकर्त्यानी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व शिवसेना नेते सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, सेना तालुका प्रमुख कांतीलाल कंठे, आप्पा घुडे, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, रिपाइं युवकचे तालुका अध्यक्ष आण्णा साळवे, प्रा. हरीचंद्र घोलप, लियाकत शेख, सुहास मोरे, पंचायत समिती सदस्य दीपक पवार, संजय हंडोरे, विकास घरत, सुवर्णा ठाकरे, निलेश पष्टे व इतर महत्वाचे पदाधिकारी या पायी प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी