Goa : बीचवर शूट करण्यात आला अश्लील व्हिडिओ, काँग्रेस म्हणालं – ‘पोर्न माफियांना प्रोत्साहन देतेय भाजपा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गोवाच्या कनकोना समुद्र किनार्‍यावर अश्लील व्हिडिओच्या शूटिंगवरून गोवा काँग्रेसने भाजपा सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोप केला आहे की, राज्यात ड्रग्ज माफिया आणि क्रिमिनल माफियांना प्रोत्साहन देणारा भाजपा आता पोर्न माफियांना प्रोत्साहन देत आहे.

गिरीश चोडणकर यांनी म्हटले की, हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहायला मिळत आहे. या व्हिडिओत मॉडल जवळपास अर्धनग्न दिसत आहे. सीएम प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे, जर त्यांनी असे केले नाही तर काँग्रेस महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरेल.

राज्य काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप आहे की, गुन्हेगारांना वाचवणारा, ड्रग्ज, भिकारी माफियांचे रक्षण करणारा भाजपा आता पोर्न माफियांना आश्रय देत आहे. आम्हाला सर्व माहित आहे की, गोवामध्ये शूटिंगची परवानगी देणारी संस्था एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आहे, तिचे प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री असतात. मग अशाप्रकारच्या शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली.

काँग्रेस नेत्याने म्हटले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे आणि आता गोव्याच्या कानाकोपर्‍यात पोहचला आहे.

त्यांनी म्हटले की, व्हिडिओ खुलेआम शूट झाला आहे. आम्ही मागणी करतो की, राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करणार्‍या लोकांविरूद्ध कठोर कारवाई करावी.