कोरोनाबाधित महिलेवर वॉर्डबॉयचा बलात्कार !

भोपाळ : वृत्त संस्था – कोरोनाबाधित महिलेवर वॉर्डबॉयने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडली आहे. बलात्कारानंतर महिलेची तब्येत खालावल्याने तिला व्हेंटिलेटरमध्ये हलविण्यात आले. मात्र यात तिचा दुस-या दिवशी मृत्यू झाला. पण कुटुंबियांने तीचा मृत्यू सर्वसामान्य कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रमाणे झाल्याचे गृहित धरल होते. 6 एप्रिल रोजी रुग्णालयात ही घटना घडली होती. महिना उलटूनही कुटुंबीयांना या घटनेचा सुगावा लागला नाही. मृत महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली होती.

रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही. बलात्काराचा विषय लपवताना पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आरोपीने चेकअपच्या नावाखाली महिलेसोबत लैंगिक अत्याचार केले होते. तसेच पोलिस आणि रुग्णालयाने कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती का दिली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी बनवारीलाल म्हणाले की, मी पीपीई किट परिधान केलेल्या महिलेचा जबाब घेण्यासाठी गेलो होतो.

पण त्याची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून मला त्यांचा जबाब घेता आला नाही. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, टीआय साहेबांशी बोलल्यानंतर ते त्या महिलेच्या कुटूंबाला माहिती देणार की नाही हे ठरवतील. या संपूर्ण वादावर रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांची बाजू अद्याप कळालेली नाही. विशेष म्हणजे वॉर्डबॉयच्या दुष्कर्मांमुळे मध्य प्रदेशातील बऱ्याच मोठ्या शहरांना लाजेने मान घालावी लागली आहे. ग्वाल्हेरमध्येही वॉर्डबॉयने बलात्काराचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी इंदौरमध्ये वॉर्डबॉयवर विनयभंगाचा गुन्हा झाला होता.