राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना आमदराचा ‘झिंगाट’ डान्स, जिल्ह्यात ‘उलट-सुलट’ चर्चा

आर्वी (वर्धा) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थीती असून त्यावर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थीती उद्भवली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षाचे आमदार एका खासगी कार्य़क्रमात ‘झिंगाट’ डान्स करताना दिसत आहेत. काँग्रेसचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील आमदार अमर काळे हे एका कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

एकीकडे दुष्काळ असताना आमदार डान्स करताना दिसत असून त्यांच्यावर टीका होत आहे.
राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. चारा बियाणे पुरवठ्यातील नियोजन योग्य नसल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. असे असताना जिल्ह्यातील आमदार दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी कार्य़क्रमांमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

यावर प्रतिक्रीया देताना आमदार काळे म्हणाले, माझ्या चुलत भावाचे लग्न होते. माझ्या भावाला आई-वडील नाहीत. त्यामुळे मी प्रमुख असल्याने कार्य़क्रमात हजर झालो होते. माझ्या बहिणीने माला नाचण्याचा आग्रह केल्यामुळे मला डान्स करावा लागला. घरीच दुष्काळ असल्याने प्रत्येक ठिकाणी मी लक्ष घालत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या भेटी घेत आहे. कृपया या घटनेशी त्याचा संबंध जोडू नका असे त्यांनी म्हटले आहे.

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?