Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Wardha Crime | वर्ध्यामध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजीपंत पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सत्याग्रही घाटात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही मृत महिला नेमकी कोण आहे?, तिचा मृतदेह सत्याग्रही घाटात कसा आला? या सगळ्यांचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. (Wardha Crime)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तळेगाव येथील रहिवासी असलेले भीमराव रमेश सिंगरे हे शनिवारी सरपण गोळा करण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी सरपण गोळा करीत असताना राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 300 फूट अंतरावर त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. तसेच पोलिसांनादेखील याची कल्पना दिली. (Wardha Crime)

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन परिसराची बारकाईने पाहणी केली. यानंतर त्यांनी त्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तातडीने तळेगाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली. लवकरच या प्रकारचा छडा लावू, असा विश्वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Wardha Crime | partially burnt body of woman was found in satyagrahi ghat wardha possibility of attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार