बाकी सब फर्स्टक्लास है ! बहुचर्चित ‘कलंक’चा ट्रेलर लाँच

मुंबई : वृत्तसंस्था – दमदार संवाद, डोळे दिपवणारे भव्य दिव्य सेट आणि बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कलंकच्या टीजर तसेच गाण्यांनंतर आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांचाही उत्सुकता वाढली आहे.

कलंक’ची नेमकी कथा काय हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चित्रपटाची कथा १९४५ च्या आसपासच्या काळात घडते. शिवाय, भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर हा चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे.. माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आत्तापर्यंत ‘कलंक’ची तीन गाणी रिलीज झाले आहेत. या तिन्ही गाण्यांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

‘कलंक’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर –
कलंकचा टीझर प्रदर्शित होण्याच्या दिवशी यू्ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम या तिन्हींवर मिळून तब्बल २ कोटी ६७ लाखांहूनही अधिक लोकांनी हा टीझर पाहिला. तितक्याच मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरदेखील करण्यात आला. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

You might also like