TRP घोटाळ्यात ‘वाॅव’ TV चाही सहभाग, आणखी एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळ्यात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी ठाण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली. आशिष अबिदुर चौधरी (५०) ( Ashish Abhidur Chaudhary) असे त्याचे नाव असून या प्रकरणातील ही अकरावी अटक आहे.त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कृत्रिमरीत्या टीआरपी वाढविण्यात वॉव टीव्हीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी यापूर्वी अभिषेक कोलवडे याला अटक केली होती. त्याच्या चाैकशीत त्याने ग्राहकांना टीव्ही बघायला भाग पाडून टीआरपी ( TRP) वाढविण्यासाठी रिपब्लिक आणि न्यूज नेशन या वृत्तवाहिन्यांकडून पैसे स्वीकारल्याचे कबूल केले.

विविध नावांनी वावरणाऱ्या अभिषेककडे वाहिन्यांनी पुरविलेले पैसे साथीदारांमार्फत ग्राहकांना पोहाेचविण्याची जबाबदारी होती. त्याच्या चौकशीत चौधरी याचे नाव समोर आले होते. चौधरी हा ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी मिडोज परिसरात राहताे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात बॉक्स सिनेमा, फक्त मराठी, रिपब्लिक, न्यूज नेशन यांची नावे समोर आली होती. त्यानंतर आता वॉव टीव्हीचे नाव देखील पुढे आले आहे.

टीआरपीसाठी ( TRP) पुरवायचा पैसे
क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचा ( Crystal Broadcast Pvt) भागीदार आशिष अभिदुर चौधरीने ( Ashish Abhidur Chaudhary) न्यूज नेशन टीव्ही, वॉव म्युझिक आणि रिपब्लिक भारत या हिंदी वाहिन्यांची टीआरपी वाढविण्याकरिता २०१७ ते जुलै २०२० या कालावधीत पैसे दिल्याचे अटक ( Arrest) केलेल्या अभिषेकने माहिती दिली होती. पण या अभिषेकची देखील अनेक नावे समोर आली होती. अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक अशा नावानी तो वावरत होता. पोलिसांनी चौधरी याच्याकडून १ लाख ५०० रुपयांसह दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या होत्या.त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणात अभिषेक आणि आशिषला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.