सावधान ! आगामी 24 तासात ‘या’ 15 राज्यात पावसाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मान्सून शेवटच्या टप्प्यात देशातील बर्‍याच भागात जोरदार हजेरी लावत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बहुतेक भाग जलमय झाले आहेत आणि या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रायलसीमा, कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील बहुतेक राज्यात पाऊस पडण्याची शक्यता –

बंगालचा उपसागर आणि आंध्रप्रदेश दक्षिण भाग ते तामिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील काही भागात तसेच बेंगळुरू, कोची आणि हैदराबाद येथे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्येही हलका पाऊस होऊ शकतो.

ईशान्य भारतातील राज्यातही हलका पाऊस –

बदललेल्या हवामान स्थितीमुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि ईशान्य भारतातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेशात कोरड्या हवामानासह सिक्कीम आणि बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस पडेल. कोलकाता, रांची येथेही हलका पाऊस होऊ शकतो. देशाच्या मध्य भागात मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व उत्तर प्रदेशात कोरडे हवामान राहील –

विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात आणि दक्षिण पश्चिम राजस्थानमध्ये एक-दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सौराष्ट्र आणि कच्छ हवामान कोरडे राहील. जम्मू-काश्मीरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हलका पाऊस पडेल. तर पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहील.

visit : Policenama.com