उत्तर भारतात अवकाळी मान्सूनचा धोका कायम तर महाराष्ट्रात हवामान स्थितीत बदल? हवामानाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने उपस्थिती दाखवली. तर उत्तर भारतातील अनेक राज्यात मान्सूनचा धोका आजही शाश्वत आहे. येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागानं केलाय. यामध्ये उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, बिहार आणि झारखंडसह दक्षिणेतील काही राज्यांचा समावेश आहे. तर आगामी २४ तासात या राज्यात विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट दूर झालं आहे. राज्यात आकाश नीरभ्र असून विविध ठिकाणी तापमानाचा पारा वाढणार आहे. काही दिवस महाराष्ट्रातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिल्यानंतर आता आगामी ३ ते ४ दिवसांत राज्यातील तापमान वाढणार आहे. तर विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. इथून पुढे उन्हाळा हंगाम प्रारंभ होणार आहे. गेल्या २ दिवसात पश्चिम महाराष्ट्रात तुरळक गारपीट झालं आहे. तर अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तर अवकाळी पाऊस कमी होऊन तापमान वाढले आहे.

दरम्यान, आगामी काही दिवस मुंबईबरोबर कोकण विभागात कमी तापमानाचा सरासरी कमीचं राहणार आहे. तसेच मुंबईतील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस असणार आहे. तसेच, कोकणातील तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे.