Fabulous Lives of Bollywood Wives : पडद्यामागे ‘असे’ आहे महीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा खान यांचं खरं आयुष्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नेटफ्लिक्स (Netflix) नं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींना घेऊन एक वेब रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज केला होता. Fabulous Lives of Bollywood Wives असं या शोचं नाव होतं. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांचा हा शो आहे.

ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, संजय कपूर, समीर सोनी, अनन्या पांडे हेदेखील दिसत आहेत. 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो रिलीज होणार आहे.

फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि अ‍ॅक्ट्रेस नीलम कोठारी सोनी दिसणार आहे. शोमध्ये या चौघींच्या आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. स्टार्सच्या वाईफ कशी लाईफ जगतात हे यात दाखवण्यात आलं आहे; परंतु त्याआधी आपण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

1) महीप कपूर (Maheep Kapoor) – महीप ही संजय कपूरची पत्नी आहे. म्हणजेच अनिल कपूर आणि बोनी कपूर यांची वहिनी आहे. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूर, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांची ती काकू आहे. महिप आणि संजय यांचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. शनाया आणि जहान अशी त्यांची नावं आहेत. महीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 1994 साली आलेल्या निगोडी कैसी जवानी या शॉर्ट फिल्ममध्ये तिनं काम केलं आहे.

2) नीलम कोठारी सोनी (Neelam Kothari Soni) – समीर सोनी सोबत नीलमनं दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाला 9 वर्षे झाली आहेत. दोघांना एक मुलगीसुद्धा आहे जिला दत्तक घेतलं आहे. तिचं नाव अहाना आहे. नीलमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 1984 साली आलेल्या जवानी या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हत्या, इल्जाम, सिंदूर, कुछ कुछ होता है असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.

3) सीमा खान (Seema Sachdev Khan) – सीमा बॉलिवूड अ‍ॅक्टर सोहेल खान याची पत्नी आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान आणि अरबाज खान यांची ती वहिनी आहे. सीमा फॅशन डिझायनर आहे. सीमा आणि सोहेल यांना दोन मुलं आहे. निर्वाण आणि योहान अशी त्यांची नावं आहेत. सीमा आणि सोहेल यांनी 27 मार्च 1998 मध्ये लग्न केलं आहे. याच दिवशी सोहेलचा प्यार किया तो डरना क्या सिनेमा रिलीज झाला होता. त्यामुळं हा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे.

4) भावना पांडे (Bhavna Pandey) – भावना पांडे फेमस बॉलिवूड अ‍ॅक्टर चंकी पांडे याची पत्नी आहे. 1998 साली दोघांनी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुली आहेत. अनन्या पांडे आणि रायसा पांडे (Rysa Pandey) अशी त्यांची नावं आहेत. अनन्या आज फेमस बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आहे. भावना फॅशन डिझायनर आहे. याशिवाय मुंबईत चंकी पांडे आणि भावना पांडे यांचं फूड रेस्टॉरंटदेखील आहे.

फेब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या फेमस वाईव्सच्या आयुष्याची झलक दाखवली जाईल. या शोची निर्मिती करण जोहरचं प्रॉडक्शन हाऊस धर्मेटीक (Dharmatic) नं केलं आहे. ही कंपनी इंटरनेटसाठी कंटेट बनवते. अपूर्व मेहता धर्मेटीकचे सीईओ आणि निर्माता आहेत. या शोचा ट्रेलर नेटफ्लिक्सनं 13 नोव्हेंबर रोजी रिलीज केला होता.

You might also like