वर एक आणि वधू मात्र दोन, नक्की ‘मॅटर’ काय ? लग्नपत्रिका होतीय भन्नाट व्हायरल

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – खरंतर सर्वसामान्यपणे कोणत्याही लग्नाची पत्रिका असो त्यावर एका वरचे आणि एका वधूचे नाव असते. मात्र पालघरमध्ये एक लग्नपत्रिका चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या लग्नपत्रिकेत वर एक आणि त्याच्या सोबत लग्न करणाऱ्या वधू मात्र दोन आहेत. या लग्न पत्रिकेत संजय धाडगा नावाच्या वराचे बेबी ठाकरे आणि रीना धोडी या दोन मुलींशी लग्न करणार आहे. येत्या २२ तारखेला हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

वर एक आणि अधू मात्र दोन, नक्की मॅटर काय ?
पालघरच्या तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा या आदिवासी पाड्यात संजय धाडगा राहतो. त्याच्या लग्नाची ही पत्रिका आहे. तो व्यवसायाने रिक्षाचालक आहे. तिथल्या आदिवासी समाजामध्ये लग्न करण्याची ऐपत नसेल तर नियोजित वधू लग्नाशिवाय पतीच्या घरी राहू शकते. अनेक महिला पुरुषांसोबत लग्न करता लिव्ह इन रिलेशन पद्धतीप्रमाणे राहतात. ज्यावेळी लग्न करण्यासाठी पैसे जमतात तेव्हा महिला आणि ती ज्याच्यासोबत राहते तो पुरुष लग्न करतात. अनेकदा पैसे जमा होईपर्यंत महिलेने मुलांना जन्म देखील दिलेला असतो.

संजयच्या बाबतीत बोलायचे झाले तर संजयचे १० वर्षांपूर्वी बेबीयांच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र लग्न करण्याची ऐपत नसल्यामुळे ते दोघे एकत्र राहू लागले. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यानंतर साधारण ६ वर्षांपूर्वी संजय यांना रिना नावाची महिला आवडायला लागली. त्यानंतर पहिली मानलेली बायको बेबी हिच्या संमतीने रिनादेखील संजय यांच्यासोबाबत राहू लागली. रिना आणि संजय यांना एक मुलगी आहे.