Weight Gain | वजन वाढवण्याची ही बेस्ट पद्धत, चेहऱ्यावर येईल ग्‍लो, तंदुरुस्‍त होण्यासाठी तथागत गौतम बुद्धांप्रमाणे बसून करा ही कृती

नवी दिल्ली : Weight Gain | लठ्ठ लोक सडपातळ होण्यासाठी अनेक उपाय करतात. याउलट काही बारीक लोकांना त्यांच्या किरकोळ देहयष्टीची काळजी वाटते. त्यांच्याही अनेक समस्या असतात. ते भरपूर खातात, कोणताही व्यायाम किंवा मेहनत करत नाहीत, तरीही शरीरावर चरबी जमा न झाल्याने त्यांना काळजी वाटते (Weight Gain Exercise at Home).

भारतात असे असंख्य लोक सापडतील जे खूप बारीक दिसतात. त्यांचे वजन कधीच वाढत नाही. त्यांना वजन वाढवायचे असते आणि निरोगी दिसायचे असते. पण औषध उपयोगी पडत नाही. येथे वजन वाढवण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय जाणून घेऊया. ज्यामुळे वजन वाढेल (Weight Gain), शिवाय चेहऱ्याचा ग्लो येईल, चेहरा चमकदार होईल.

प्रत्येक आजारावर योगामध्ये उपाय आहे. शारीरिक ते मानसिक आणि अध्यात्मिक समस्यांवर योगामध्ये उपाय आहेत. बारीक लोकांना जाड करण्याचा उपाय सुद्धा योगामध्ये आहे. एसएम योग रिसर्च इंस्‍टीट्यूट अँड नॅचरोपॅथी हॉस्पिटल इंडियाचे सचिव आणि शांती मार्ग द योगाश्रम अमेरिकाचे फाउंडर आणि सीईओ योगगुरु डॉ. बालमुकुंद शास्‍त्री सांगतात की, योगामध्ये ८ हस्तमुद्रा सांगितल्या आहेत. त्या इतक्या प्रभावी आहेत की जर कोणी त्यांचा सराव केला तर त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो.

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांनी योगाच्या सर्व आसनांचा अभ्यास केला होता. ते याच मुद्रांसह ध्यान आणि साधना करत असत. यापैकी एक म्हणजे पृथ्वी मुद्रा. ही ध्यानाची मुद्रा असली तरी, जे वजन वाढवू शकत नाहीत त्यांच्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. ती खूप सोपी आहे. ती करण्यासाठी केवळ बसावे लागेल.

पृथ्वी मुद्रा वाढवते वजन
डॉ. बालमुकुंद सांगतात की पृथ्वी मुद्रा शरीरातील पृथ्वी तत्व वाढवते. हे तत्व हाडे आणि मासपेशींच्या रूपात शरीरात असते. या तत्वाचा सराव केल्याने फ्रॅक्चर इत्यादी बरे करण्यास मदत होते. जर एखादी व्यक्ती खूप बारीक असेल तर याच्या नियमित सरावाने ती काही दिवसात धष्टपुष्ट आणि तंदुरुस्त होईल.

जर इम्युनिटी कमकुवत असेल तर त्यासाठी सुद्धा ही मुद्रा लाभदायक आहे.
तसेच सांधेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास असेल तरी या मुद्रेच्या सरावाने फायदा होतो. यासोबतच चेहऱ्याची चमक वाढते.

इम्युनिटी आणि ब्रेनचा विकास
ही मुद्रा संपूर्ण शरीरावर परिणाम करते. ती मेंदूच्या विकासासाठी प्रभावी आहे. इम्युनिटी वाढवते.
याचा सराव सकाळी अथवा संध्याकाळी १५ मिनिटे, अर्धा तास किंवा १ तास करू शकता.
लक्षात ठेवा, जेवल्यानंतर या मुद्रेत बसू नका.

कोणी करू नये या मुद्रेचा सराव
जे लठ्ठ आहेत त्यांनी या मुद्रेचा अजिबात सराव करू नये. या मुद्रेमुळे ऊर्जा वाढते. या मुद्रेचा सराव आपण ध्यानाच्या पद्मासन,
वज्रासन, सिद्धासन इत्यादींमध्ये करू शकता.

पृथ्वी मुद्रा कशी करावी
पृथ्वी मुद्रा करण्यासाठी रिंग फिंगर म्हणजे अनामिका आणि अंगठ्याचे पोर जोडाचे आणि बाकीची बोटे सरळ ठेवावी.
यानंतर पद्मासन किंवा वज्रासनात ध्यानाला बसावे. तुम्ही अनेक मुर्ती पाहिल्या असतील ज्यामध्ये तथागत
भगवान गौतम बुद्धांच्या हातांमध्ये ही मुद्रा दिसून येते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ओंकार बाणखेले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दुहेरी मोक्क्यातील टोळी प्रमुख सुधीर थोरात याला जामीन मंजुर