Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी, दुधी हलवा आणि दुधीचा ज्यूस प्यायला असेलच, पण तुम्हांला हे माहीत आहे का की दुधीचे सूपही बनवले जाते. दुधी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक पदार्थ दुधीपासून बनवलेले असतात, जे जवळजवळ सर्वजण खातात. (Weight Loss)

 

दुधीमध्ये भरपूर पाणी आढळते. दुधीत प्रोटीन, कार्ब्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळते. याशिवाय पोटॅशियम, सोडियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी देखील आढळते. दुधीचे सूप बनवून प्यायल्यास आरोग्य चांगले राहते.

 

दुधीचे सूप प्यायल्याने भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. दुधीचे सूप प्यायल्याने हायड्रेटेड राहाल, तसेच इम्युनिटी वाढेल. याशिवाय दुधीचे सूप प्यायल्याने अनेक फायदे होतात.

 

दुधीचे सूप पिण्याचे आरोग्य फायदे…

१. पचनसंस्था राहील चांगली
दुधीचे सूप नियमित प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते. दुधी पचनासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी दुधीचे सूप पिऊ शकता.

२. पोटाच्या समस्या
दुधीचे सूप रोज प्यायल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीमध्ये आराम मिळतो. दुधीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनमार्ग साफ होतो. म्हणूनच आहारात दुधीचा समावेश करावा.

 

३. लठ्ठपणा होऊ शकतो कमी
दुधीचे सूप प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो. नियमित दुधीचे सूप प्यायल्याने वजन कमी होते. वजन खूप जास्त असेल तर दुधीचे सूप पिऊन ते सामान्य करू शकता. दुधीचे सूप प्यायल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे जास्त खाणे टाळू शकता आणि वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी नियमित रात्रीच्या जेवणात किंवा स्नॅक्समध्ये दुधीचे सूप पिऊ शकता.

 

दुधीचे सूप बनवण्याची पद्धत :
सर्वप्रथम, दुधी नीट धुवा. नंतर त्याचे लहान तुकडे करा. यानंतर कढईत तूप वितळवून घ्या.
त्यात जिरे टाका आणि नंतर दुधी घालून तळून घ्या. आता दुधी झाकण ठेवून शिजवा.
त्यात थोडे पाणी घालून शिजू द्या. दुधी चांगली शिजल्यावर मॅश करून घ्या. त्यात मीठ घालून गाळून घ्या.
काळी मिरी आणि आल्याचे तुकडे टाका. आता दुधीचे गरमागरम सूप प्या. हे प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

Lifestyle | आपण रोखू शकत नाही वाढते वय, परंतु टाळू शकतो, एक्सपर्टकडून जाणून घ्या काय खाल्ल्याने त्वचा राहील तरूण

Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह