रिकाम्या पोटी करा वेटलॉस ड्रिंकचे सेवन, वजन कमी होण्यासह पोटाची चरबी होईल कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैलीमुळे वजन वाढते. यावर आयुर्वेदात अनेक उपचार आहेत. यासाठी मसाले चांगले औषध मानले जाते. ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होण्यासह अनेक आजारांपासून सुटका होते. आज आम्ही एक असे ड्रिंक सांगणार आहोत ज्याचे रोज सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. तसेच शरीरातील चरबी कमी होते. वेगाने वजन कमी करायचे असेल तर आपल्या डाएटमध्ये या स्पेशल ड्रिंकचा आवश्य समावेश करा.

वेट लॉस ड्रिंकसाठी साहित्य
1.
पाच चमचे हळद
2. एक चमचा दालचीनी पावडर
3. एक चमचा सुंठ पावडर
4. एक चमचा काळीमिरी पावडर

असे तयार करा ड्रिंक
एका बाऊलमध्ये या सर्व वस्तू मिसळून एका एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. यानंतर ते 8-10 मिनिटे तसेच ठेवा. नंतर याचे सेवन करा. जर सकाळी पिऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा.