Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल जिममध्ये जाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळतात, पण याचा अर्थ जिममध्ये गेल्याशिवाय वजन कमी करता येत नाही, असा होत नाही. व्यायामशाळेत न जाताही वजन कमी करता येते. काही सोपे घरगुती उपाय करून वजन कमी (Weight Loss) करू शकता. जर वजन कमी करायचे असेल तर रात्री झोपताना काही ड्रिंक्स घेतल्यास हे सहज शक्य आहे.

 

१. मेथीचे पाणी
मेथीचे पाणी हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मेथीदाणे भिजवून त्याचे पाणी प्या. या पाण्याचा परिणाम लवकरच दिसून येतो. मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. मेथीचे पाणी रिकाम्या पोटी पिणे फॅट बर्नसाठी फायदेशीर मानले जाते. लठ्ठपणाशिवाय अनेक आजारांवरही हे पाणी फायदेशीर आहे.

 

२. दालचिनी ड्रिंक्स
दालचिनीचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. दालचिनीचा चहा प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि फॅट जलद बर्न होते. दालचिनी उकळून गाळून घ्या आणि या पाण्यात मध टाकून प्या. त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येईल. (Weight Loss)

३. हळदीचे दूध
दुधाबाबत प्रत्येकाच्या मनात एक समज आहे की ते पिल्याने वजन वाढते, मात्र हळदीचे दूध प्यायल्याने वजन कमी करता येते. यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे शरीर मजबूत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. हळदीचे दूध प्यायल्याने पचन आणि चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

 

या टिप्स फॉलो करा
आहाराव्यतिरिक्त, वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही घरच्या घरी काही वजन कमी करण्याचे व्यायाम किंवा योगासने करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | weight loss drinks home remedies for belly fat burn

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neeraj Chopra | नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम! उसेन बोल्टचा ‘तो’ विक्रम मोडला

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

CM Eknath Shinde | ‘काम करण्याची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला (व्हिडिओ)