What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest | Cardiac Arrest आणि Heart Attack मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कोणत्या आजारापासून किती धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest | अलीकडेच, प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ (KK) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यानंतर त्यांच्या करोडो चाहत्यांना धक्का बसला आहे. ह्रदयाच्या आजारा (Heart Disease) मुळे अनेक सेलिब्रिटी गेल्या काही काळापासून आपल्यातून निघून गेले आहेत. हृदयरोग अनेकदा प्राणघातक ठरतो, त्यामुळे त्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नये (What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest).

 

हृदयाच्या आजारांमध्ये फरक (Differences In Heart Disease)
हृदयविकारांबद्दल जेंव्हा बोलले जाते तेंव्हा आपण अनेकदा हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट (Heart Attack, Heart Failure Cardiac Arrest) बद्दल ऐकतो, ते वेगळे आहे की त्याला एकच आजार समजावे ते जाणून घेतले पाहिजे.

 

ऐकायला ते एकसारखे वाटत असले तरी ते एकच रोग नाहीत. यातील फरक तपशीलवार समजून घेऊयात…

 

1. हार्ट अटॅक (Heart Attack)
हार्ट अटॅकला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (Myocardial Infarction) देखील म्हणतात, जेव्हा कोरोनरी धमनीमध्ये अचानक अडथळा येतो तेव्हा हा होतो. धमनीच्या मदतीने रक्त हृदयापर्यंत पोहोचते, हार्ट अटॅक आल्याने हृदयाच्या आत असलेले काही स्नायू अचानक काम करणे बंद करतात.

 

या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपचार केले जातात, ज्यामध्ये अँजिओप्लास्टी, स्टंटिंम आणि बायपास सर्जरी यांचा समावेश होतो.

2. हार्ट फेल्युअर (Heart Failure)
जेव्हा हृदयाचे स्नायू शरीराला आवश्यक काम करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करण्यास सक्षम नसतात तेव्हा हार्ट फेल्युअर होते.
जेव्हा हृदय कमकुवत होऊ लागते तेव्हा अशी स्थिती निर्माण होते.

 

हार्ट फेल्युअर सामान्यतः कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease), हाय ब्लड प्रेशर किंवा
कार्डिओमायोपॅथी (Cardiomyopathy) सारख्या समस्यांमुळे हार्ट फेल होऊ लागते.

 

3. कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest)
कार्डियाक अरेस्टची तेव्हा उद्भवते जेव्हा हृदयाच्या आत वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन विकसित होण्यास सुरुवात होते,
म्हणजेच हृदयाच्या आत वेगवेगळ्या भागांमध्ये कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ लागते.

 

याचा हृदयाच्या ठोक्यावर वाईट परिणाम होतो आणि हा त्रास मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास हृदयाचे ठोके बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो.
त्यातील रुग्णांना सीपीआर दिला जातो ज्यामुळे श्वासोच्छवास घेण्याचा त्रास दूर होतो. काही वेळा ’डिफिब्रिलेटर’द्वारे रुग्णांना विजेचा धक्का दिला जातो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest | difference between heart attack cardiac arrest and heart failure how to detect disease symptoms

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Saving Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनांबाबत

 

Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! स्कूल बसच्या चाकाखाली सापडून 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

 

Presidential Election | राष्ट्रपतिपदाची निवडणुक लढवण्यास शरद पवारांचा नकार, सीताराम येचुरी यांची माहिती