शरद रणपिसे यांचे भवितव्य काय?

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

विधानपरिषदेसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होतील. पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार शरद रणपिसे यांना उमेदवारी मिळेल का? याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी होती.

विधानपरिषदेसाठी येत्या १६ तारखेला निवडणूक होणार असून त्यासाठी दिनांक ५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. विधीमंडळातील संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. दोन उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक झाली. ही बातमी काँग्रेस भवनत समजताच रणपिसेंच्या उमेदवारीचे काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये झाली.

[amazon_link asins=’B076CMLXXX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69d0acdc-7ed4-11e8-a8b8-6b139e8a26ed’]

मुंबईतील इच्छुकाला उमेदवारी मिळेल की विदर्भातील इच्छुकाला उमेदवारी मिळेल? याचे आडाखे बांधले जात होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. रणपिसे आणि पाटील हे पुणे जिल्ह्यातील दोन नेते इच्छुकांच्या यादीत आहेत. पक्षाचे प्रभारी खर्गे यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची बारकाईने माहिती असल्याने ते कोणता निर्णय घेतात याची चर्चा होती.