मेंदूज्वर म्हणजे काय? कसा रोखला जाऊ शकतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

मुंबई : ऑनलाइन टीम – सध्या कोरोना माहामारीचे संकट असून या काळात लसीकरणाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. लसीकरणामुळे जास्त भूक लागत असल्याने प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण होते. न्यूमोकोकल न्यूमोनियासारखेच, व्हायरस आणि बॅक्टेरियाद्वारे पसरलेले इतर अनेक आजार लस प्रतिबंधित आहेत. असाच एक आजार म्हणजे मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर). या आजारात मृत्यू दर जास्त आहे. हा आजार प्रामुख्यांने लहान मुलांना होते. योग्यवेळी उपचार केले नाही तर मेंदूला गंभीर इजा होऊ शकते.

मेंदूज्वर म्हणजे काय ?

हे एक गंभीर इन्फेक्शन असून याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो. हा आजार बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे होतो. मेंदूज्वर नायसेरिया मेनिंगिटायडिस बॅक्टेरियामुळे होतो. ज्यामुळे आजाराची तीव्रता वाढते. हा आजार श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानं संक्रमण वाढते. याची लक्षणे दिसल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जे रुग्ण बरे झाले, त्यांच्यातील 5 पैकी एकाला ऐकू कमी येणे, मेंदूला इजा होणे, मानसिक अपंगत्व किंवा अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

काय आहेत उपाय

हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, पौगंडावस्थेतील आणि तरुणांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. यापैकी प्रतिबंधात्मक लसीकरण हा एक उपाय आहे. तसेच यामुळे प्राण वाचून त्रास कमी करता येऊ शकतो. तसेच संक्रमण होणाऱ्या गोष्टींपासून लहान मुलांना दूर ठेवले पाहिजे. तसेच स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.

आजार कसा पसरतो आणि त्याची लक्षणे कोणती

खोकला आणि शिंकण्यापासून ते अन्न-पाणी शेअर करणे आणि जवळ-जवळ राहणे या रोजच्या सवयी मेंदूज्वर होण्यास कारणीभूत ठरु शकतात. जीवाणू नाक आणि घशात राहतात आणि संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. लक्षणांचा विचार करता मेंदूज्वरामध्ये सर्दी, फ्लू ज्यामुळे त्वरित खूप ताप येतो किंवा थंडी वाजून येते, हात-पाय थंड पडतात, स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात, अंगावर गडद जांभळे रॅशेस येतात, शरीरातील संवेदना जातात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

मुलांचा मेंदूज्वर आजारापासून संरक्षण करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण. वेगवेगळ्या प्रकारच्या मेनिंगोकोकल आजारांसाठी वेगवगेळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. भारतात उपलब्ध असलेल्या मेनिंगोकोकल ACWY लसीमुळे चार प्रमुख प्रकारच्या मेनिंगोकोकल आजारांपासून संरक्षण होऊ शकते. हा आजार गंभीर असून याचे खूप धोके आहेत. मात्र, मुलांना वेळेवर लस दिल्यास त्यांना आजारापासून दूर ठेवणे शक्य आहे. जर आपल्या मुलास यापूर्वी लस दिली गेली नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.