बिहारच्या लष्करी शाळेचा WhatsApp ग्रुप हॅक; PAK मधून पाठविण्यात आले अश्लील फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गामुळे सध्या शाळांच्या व्हाट्सअपवर ग्रुप ऑनलाईन क्लास सुरु आहेत. व्हाट्सअपवर ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होत असतात. दरम्यान, बिहारच्या गोपालगंज येथील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हॅकिंग पाकिस्तानमधून झाल्याचं समजतं.

गोपाळगंजच्या हथुआ येथील लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप हॅक केला. व त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत. या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराच्या माहितीसाठी ही धोक्याची चिन्ह असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तानी नंबर वरून व्हाट्सअप ग्रुप हॅक
व्हाट्सअपवर ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होत असतात. तो ग्रुप हॅक करून त्यावर अश्लील फोटो टाकण्यात आले. परदेशातून हॅकिंग झाले असल्याने प्रकरण गंभीर असल्याचे व्यवस्थापनाने म्हटलं आहे. व्हाट्सअप वर ज्या नंबर वरून अश्लील पोस्ट आणि मेसेज टाकण्यात आले आहेत तो फोन नंबर पाकिस्तानचा असल्याचं समोर आलं आहे लष्करी शाळेचा थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्यानं आणि पाकिस्तानातून हॅकिंग झाल्याचं निष्पन्न झालेली खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात एफआयआर दाखल केले. तसंच, चौकशीला सुरुवात केली आहे.