WhatsApp मध्ये कोणते Chats मोबाईलची स्टोरेजची स्पेस संपवताहेत, ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – बॅकअप आणि मीडियासाठी WhatsApp मोबाईलमधील स्पेस जास्त खात असल्यानं काहींसाठी ते आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अनेक ग्रुप्स आणि अनेक चॅट्समुळंही भरपूर स्पेस जात असते. फेसबुकनं सांगितलं आहे, की जगभरात दिवसाला जवळपास 100 अब्ज मेसेज पाठवले जातात. आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वाधिक मेसेज कुणाचे येतात आणि कुणाचे मेसेज जास्त स्पेस घेतात हे देखील पाहता येणार आहे.

अनेकदा WhatsApp मधील Media Auto-Download हा पर्याय इनेबल असल्यानं अनेक प्रकारच्या फाइल ऑटोमेटीक डाउनलोड होतात आणि जास्त जागा जाते. काहीजण वेळोवेळी चॅट डिलिटही करत असतात.

कोण किती जागा खातंय हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

– WhatsApp ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील वरच्या बाजूला असणाऱ्या 3 डॉटच्या ऑप्शनवर क्लिक करा.
– यानंतर सेटिंगवर क्लिक करा.
– सेटिंगमध्ये Data and Storage Usage या पर्यायावर क्लिक करा. इथून तुम्ही या अ‍ॅपनं किती स्टोरेज घेतलं ते पाहू शकता.
– याच ऑप्शनमध्ये तुम्हाला मॅनेज स्टोरज असा ऑप्शन दिसतो. तुमच्या मोबाईलवर किती फोटो, व्हिडीओ जीआयएफ आणि इतर फाइल्स आल्या आहेत याची माहिती मिळते. व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला Free up space चा पर्याय देतं. जर तुम्हाला त्या फाईल्स डिलिट कराव्या वाटत असतील तर त्यावर क्लिक करून तुम्ही डिलिट करू शकता
– परंतु जर तुम्हाला कोणी कोणती फाइल पाठवली हे चेक करायचं असेल तर त्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपवर जाऊनही तुम्ही चेक करू शकता. ही लिस्ट खालीच दिलेली असते. त्यावर गरजेच्या नसलेल्या फाइल्स डिलिट करता येणार आहेत.