WhatsApp Chat चा ‘रंग’ आणि ‘डिझाइन’ बदलणार, फोटोमध्ये पाहा कसं असणार नवीन लूक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्हॉट्सअ‍ॅप नेहमी वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणत असते आणि आता व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर्सवर काम करत आहे. WABetaInfo ने उघड केले आहे की नवीन फीचर चॅट डिझाइनशी जोडलेले आहे, जे की डार्क मोड (Dark Mode) साठी येणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडसाठी नवीन बबल कलरची टेस्ट घेत आहे, जे येत्या काळात लॉन्च होईल.

WABetaInfo ने केलेल्या ट्विटमध्ये असे दिसून आले आहे की नवीन फीचर आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी येईल. असं म्हटलं जात आहे की सध्या त्याची कोणतीही रिलीज तारीख समोर आलेली नाही. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. हे फीचर कसे दिसेल, त्याचा एक स्क्रीनशॉट देखील ब्लॉगमध्ये शेअर केला गेला आहे. असा अहवाल देण्यात आला आहे की स्क्रीनशॉट आयओएस व्हर्जनचा आहे आणि अँड्रॉइडवरही असेच डिझाइन दिसेल.

काय आहे हे फीचर?

जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड सक्रिय केले जाईल, तेव्हा आउटगोइंग बबलचा रंग बदलला जाईल. हे सध्याच्या बबलपेक्षा कसे वेगळे आहे ते खाली पाहिले जाऊ शकते.

या ब्लॉगमध्ये असेही म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅपने हे करण्यामागील हेतू काय आहे हे सध्या तरी स्पष्ट झाले नाही. तसेच असेही म्हटले जात आहे की येत्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवर आणखी काही बऱ्याच कलरचे बबल येऊ शकतात.

येत आहे ‘सर्च बाय डेट’ फीचर

कलर बबल व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप दुसर्‍या फिचरवर काम करत आहे. जर एखाद्या विशिष्ट दिवशी पाठवलेल्या /प्राप्त झालेल्या संदेशाचा शोध घ्यायचा असेल तर या फीचरद्वारे तारखेनुसार म्हणजेच ‘सर्च बाय डेट’ (Search by date) ने सहज सापडता येईल. WABetainfo च्या अहवालानुसार हे फीचर सध्या प्रगतीपथावर आहे आणि त्यावरील टेस्टिंग घेण्यात येत आहे आणि हे लवकरच जारी करण्यात येईल. हे फीचर सर्वात आधी आयफोनमध्ये वापरले जाऊ शकते, त्यानंतर हे अँड्रॉइड डिव्हाइससाठी देखील जारी केले जाईल.