WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप सतत इतर पेमेंट्स कंपन्यांच्या (WhatsApp Payment) स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी अ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल करत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपने Identity Verification चं फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. भारतातील इतर ऑनलाइन पेमेंट (WhatsApp Payment) कंपन्या युजर्सला Identity Verification करण्यास सांगत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 2020 मध्ये ही सेवा सुरु केली होती.

व्हॉट्सअपने जून 2021 मध्ये भारतात पेमेंट सेवेची (WhatsApp Payment) सुरुवात सर्वांसाठी लागू केली होती. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटला पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pay), गुगुल पे (Google Pay) आणि अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या स्पर्धेचा सामना करावा लागला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर Identity Verification आणण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. या निर्णयामुळे युजर्सला हे अ‍ॅप वापरण्यापूर्वी Identity Verification करणं गरजेचं आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपची ही पेमेंट सेवा भारत आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. भारतात फक्त बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि डेबिट कार्डद्वारे या अ‍ॅपवर पेमेंट करता येते. याशिवाय ब्राझीलमध्ये युजर्सला फेसबुक आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या अहवालामध्ये Whatsapp v2.21.22.6 च्या बीटा सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
हे Identity Verification त्याच युजर्ससाठी असेल जे व्यावसायीक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार आहेत.
त्यामुळे युझर्सला सुरक्षितपणे पेमेंट करता येईल, असा अंदाज लावला जात आहे.
तसेच व्हॉट्सअ‍ॅपची ही सेवा आता इतर काही देशात सुरु होण्याची शक्यता आहे.

1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार

दरम्यान भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे.
हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असून चॅटिंगपासून ते अनेक कार्यालयीन कामांसाठी याचा वापर केला जातो. मात्र काही स्मार्टफोन (smartphone) युजर्सला 1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.
काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद (discontinued) करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Winter Tips | हिवाळ्यात खोकला-सर्दी-ताप त्रास देत आहे का? ‘हे’ 7 नैसर्गिक फूड देतील आराम

Mumbai Cruise Drug Case | किरण गोसावी पुन्हा ‘पसार’, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : WhatsApp Payment | identity verification is now required for whatsapp payment know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update