व्हाट्सअ‍ॅप १० वर्षांचं झालं ; आजपर्यंत झाले ‘हे’ बदल 

दिल्ली : वृत्तसंस्था – अवघ्या काही वर्षात भारतच नाही तर अगदी जगभरातल्या तरुणाईला व्हाट्सअ‍ॅपने वेड लावले. या व्हाट्सअ‍ॅपने लोकांचे रोजचे जीवनच व्यापून टाकले. सुरुवातीला फक्त आयफोन युजर्ससाठी बनवण्यात आलेले हे अ‍ॅप आता घरोघरी पोहचले आहे. याच व्हाट्सअ‍ॅपला दहा वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षात व्हाट्सअ‍ॅपने आपल्या युजर्स साठी अनेक बदल केले. गेल्या दहा वर्षात पुढील बदल व्हाट्सअ‍ॅपमध्ये करण्यात आले.

२००९ : २००९ मध्ये या व्हाट्सअ‍ॅपची सुरुवात झाली. सुरवातीला केवळ आयफोन आणि अँड्रॉइड युजर्ससाठी हे व्हाट्सअ‍ॅप सुरू करण्यात आलं होतं. सुरुवातीला मॅसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हाट्सअ‍ॅप लॉंच करण्यात आलं होतं. पण २००९ अखेरपर्यंत व्हाट्सअ‍ॅप मध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे ऑप्शन्स देण्यात आले होते.

२०१० : यावर्षी व्हाट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक बदल करण्यात आला या व्हाट्सअ‍ॅपमध्ये लोकेशन शेअरिंग अ‍ॅप देण्यात आलं होतं.

२०१३ : २०१० नंतर व्हाट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. २०१३ मध्ये व्हाट्सअ‍ॅप ग्रुप फिचरची निर्मिती करण्यात आली. यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मित्र -परिवाराचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार केले.

२०१४ : २०१४ पर्यंत जगभरात व्हाट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ५० कोटी पर्यंत पोहचली. याशिवाय व्हाट्सअ‍ॅपने फेसबुकशी करारही केला. रिड रिसिप्ट्स फिचरही याचवर्षी तयार करण्यात आले.

२०१५ : यावर्षी व्हाट्सअ‍ॅप वेबची निर्मिती करण्यात आली. यानंतर डेस्कटॉपवरही व्हाट्सअ‍ॅप उघडण्यात येऊ लागले.

२०१६ : यावर्षी व्हाट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटीच्या पार गेली. यावर्षी व्हाट्सअ‍ॅप वरून व्हिडिओ कॉलिंग, एन्ड टू एन्ड एनक्रिपशन सारख्या सुविधा देण्यात आल्या.

२०१७ : यावर्षी व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी स्टेटस हे फिचर अ‍ॅड करण्यात येईल अशी सुविधा तयार करण्यात आली.

२०१८ : यावर्षी व्हाट्सअ‍ॅप मध्ये आणखी काही प्रमाणात बदल करण्यात आले. व्हिडिओ ग्रुप कॉलिंग, व्हाट्सअ‍ॅप स्टिकर्स आणि व्हाट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपअसे फिचर्स व्हाट्सअ‍ॅप द्वारे लाँच करण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like