WhatsApp च्या नवीन अपडेटमध्ये Admin ला मिळेल जबरदस्त Power, कुणाचाही मेसेज करू शकणार डिलीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp सध्या नवीन अपडेटचे टेस्टिंग करत आहे, ज्यामध्ये ग्रुप अ‍ॅडमिनला अनेक नवीन पावर मिळणार आहेत. या नवीन पावर अंतर्गत ग्रुप अ‍ॅडमिन ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीचा मेसेज डिलीट करू शकतो. आतापर्यंत तुमचे मेसेज डिलीट करण्याची सुविधा केवळ तुमच्यापर्यंतच मर्यादित होती, परंतु आता ग्रुपमध्ये तुमचा मेसेज अ‍ॅडमीन डिलीट करू शकतो. (WhatsApp)

 

WhatsApp अपडेट्सवर नजर ठेवणारी पब्लिकेशन WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये या नवीन अपडेटची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, कंपनी सध्या आपल्या नवीन अपडेटची चाचणी करत आहे. या अपडेटच्या रोलआऊटनंतर, इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर ग्रुप चालवणारा अ‍ॅडमिन ग्रुपच्या कमांडवर असेल आणि तो कोणत्याही व्यक्तीचा आक्षेपार्ह मेसेज स्वत: डिलीट करू शकेल.

 

रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की, मेसेज डिलीट केल्यानंतर ग्रुप सदस्यांना नोटिफिकेशन मिळेल. या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की ग्रुप अ‍ॅडमिनने त्याचा किंवा ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा मेसेज डिलीट केला आहे.

आतापर्यंत ’Delete For Everyone’ फीचर वापरून फक्त तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज डिलीट केले जाऊ शकत होते. मात्र, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवल्यास, नवीन अपडेटनंतर तुम्ही कोणाचेही मेसेज हटवू शकाल. सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्रुपची एकंदर कमांड अ‍ॅडमिनच्या हातात असेल.

 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची सूत्रे अ‍ॅडमीनकडे सोपवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज डिलीट करण्याच्या कालावधीतही बदल केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार, येत्या अपडेटमध्ये तो 2 ते 12 दिवस केला जाणार आहे.

 

सध्या, फिचर डेव्हलपमेंट स्टेजवर आहे. ते कधीपर्यंत सर्व यूजर्ससाठी रिलिज केले जाईल याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

 

WhatsApp चॅट लिस्टमध्ये दिसेल स्टेटस
व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या यूजर्ससाठी Instagram चे एक खास फीचर आणणार आहे.
हे फीचर सुरू केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस दिसेल.
एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्रोफाइलवर स्टेटस अपडेट केले असल्यास, प्रोफाइल पिक्चर हिरवे होईल.
तुम्ही चॅटवर क्लिक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडो उघडेल.
दुसरीकडे, जर तुम्ही त्यांच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक केले तर तुम्हाला त्याचे स्टेटस दिसेल.

 

Web Title :- WhatsApp | whatsapp reportedly working on a new update that let group admin delete anyone message

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा