‘आणीबाणी’ ! जयंत पाटलांच्या टीकेला हरिभाऊ बागडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूनं ऐकायला येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांच्यावर टीका केली. त्यावर मला माझ्या व्यंगाचं दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो, अशा शब्दांत हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले आहे.

हरिभाऊ बागडे म्हणाले की, ‘मी विरोधकांचे ऐकले नाही, हा आरोप खोटा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी 3-3 तासांची चर्चा 8 तास चालवली. परंतु, मला एका कानाने ऐकू येत नाही, हे अनेकांना माहिती नाही. ते माझं आजचं व्यंग नाही. तसेच ते लहानपणाचं पण नाही. तर ते आणीबाणीच्या काळातलं आहे. व मला त्याचा रास्त अभिमान आहे.

त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचं काम होतं. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण 2-3 दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचं नाही. या घटनेला आता 45 वर्ष झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे.’ आणीबाणीच्या वेळी कुठे होतात सांगू का ? पण ते आज मी सांगणार नाही. कारण मी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करायला उभा आहे’, असं बागडे यांनी म्हटलं.

विधानसभा अध्यक्षपदाची आज होणारी निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

Visit : Policenama.com