भाजप-सेनेनं आता कुठं नेऊन ठेवलाय ‘महाराष्ट्र माझा’ : खा.डॉ. अमोल कोल्हे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, दर दिवसाला पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत, दिवसाला पाच ते सहा बलात्कारासारख्या घटना घडत आहेत,  दिवसाला पाच ते सात कुटुंबातली लहानगी कच्ची बच्ची पोरकी होत आहेत, २०१४ सालच्या निवडणुकीच्या वेळी जे आम्हाला जाब विचारत होते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..? त्यांना आज तुम्ही-आम्ही एका सुरात जाब विचारण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने अत्ता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक व खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी इंदापूर येथे शिवस्वराज्य यात्रा सभेत बोलताना विरोधकांना केला.

डाॅ . अमोल कोल्हे हे इंदापूर येथे शिवस्वराज्य यात्रा जाहीर सभेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या पाच वर्षात राज्यातील माता भगीनीवर झालेल्या अत्यांचारांची संख्या पाहीली तर १ लाख २५ हजारच्या वर आहे. यामध्ये १६ हजार ५०० बलात्काराच्या केसेस आहेत, ३७ हजार विनयभंगाच्या केसेस आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राझ्यांच्या पाटलाचा चौरंगा केला होता, त्या महाराजांचा महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने कुठे नेवुन ठेवलाय..? याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. गावागावात सुशिक्षित बेकार असलेल्या युवक, तरूणांची टोळकीच्या टोळकी दिसुन येत आहेत. या तरूणांच्या हातात डीग्रीची प्रमाणपत्र आहेत.

परंतु माथ्यावर मात्र शिक्का बसतोय बेरोजगारीचा. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार कंपण्या बंद पडल्या आहेत. गेल्या ४५ वर्षात जी परिस्थिती कधी उदभवली नव्हती ती परिस्थिती या पाच वर्षात भाजप शिवसेनेच्या काळात अणूभवायला मिळत असल्याने सत्ताधारी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केल्याचे मत डाॅ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त करून भाजप शिवसेनेवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की शिवस्वराज्य यात्रा आपल्यादारात आलेली आहे. ती कोणाला विरोध म्हणून नाही. तर महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेनेने मागील पाच वर्षात महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवली आहे हे सांगण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत. सध्या ज्याला भिती दाखवेल तो सध्याभाजपमध्ये जातो आहे. ज्याचा विक पाॅइंट आहे त्यावर बोट ठेवले की तीकडे जावुन तो नमस्कार करतोय. २०१४ पूर्वी अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाच भांडवल भाजप शिवसेनेने केल होत.

परंतु पाच वर्षात काहीच निष्पन्न न झाल्याने आता ते भांडवल संपल आहे. म्हणून पुन्हा २०१९ ला २५ हजार कोटी रूपयांचा अजित पवार व इतरांनी राज्य बँकेत घोटाळा केलेला आहे हे आरोप लावले जात आहेत. हे सर्व तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न पुढच्या १५ दिवसात होणार आहे. आम्हाला जे सोडून जात आहेत त्या ठीकाणी नविन उभारणी करण्याचे काम शरद पवार करत आहेत त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये असे जयंत पाटील यांनी सांगीतले.

मंगळवार दिनांक २७ रोजी सकाळी ११ वाजता शिवस्वराज्य यात्रेचे आगमन इंदापूर नगरपरिषदेच्या मालोजीराजे भोसले मैदानावर झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळ्यास माण्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आला. व माण्यवरांची रथातुन मिरवणुकीद्वारे सभेच्या ठीकाणी आगमण झाले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.डाॅ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर,  अमोल मेटकरी,  कृृृषि उत्पन्न बाजार समीतीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, दशरथदादा माने, जि. प.बांधकाम सभापती प्रविण माने, जि. प. सदस्य अभिजित तांबीले, महारूद्र पाटील, छायाताई पडसळकर, अमोल भिसे, गजानन गवळी, पोपट शिंदे, अनिल राऊत, बाळासाहेब ढवळे, धनंजय बाब्रस, इत्यादी प्रमुख उपस्थित होते. प्रस्ताविक महारूद्र पाटील यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –