नवाब मलिक यांचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले – ‘जिथे भाजपा तिथेच मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना मृतांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचली असून हे महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याची टीका भाजपाने bjp केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अन् राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला bjp जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जिथे भाजपाचे सरकार आहे तिथेच मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपासारखे bjp आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नसल्याची टीका मलिक यांनी केली आहे.

Pune Fire News | पुण्यालगतच्या एमआयडीसीतील वॉटर प्युरीफायर कंपनीमध्ये भीषण आग; 18 कर्मचार्‍यांचा मृत्यू

राज्यात पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे केली आहे.
संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाली आहे. आम्ही कुठलेही आकडे लपवले नाहीत.
जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे.
70 हजार दरदिवशी केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही अशा बातम्या आल्या नाहीत.
त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र आणि मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाल्याचे मलिक म्हणाले.

उत्तर प्रदेशातील नदीतील मृतदेहांवरुन टीका
एकट्या उत्तर प्रदेशात 5 ते 6 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत सोडण्यात आले तर काही ठिकाणी नदीकिनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह आढळले. गुजरात आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवल्याचे समोर आले आहे. भाजपाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नसल्याचे मलिक यांनी सांगितले.

Also Read This : 

 

Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन