‘मर्दानी’ ! तिनं पतीला गर्लफ्रेन्डसह पाहिलं सिनेमागृहात, पत्नीनं पुढं केलं ‘असं’ काही

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गर्लफ्रेंडसोबत राणी मुखर्जीचा ‘मर्दानी-2’ चित्रपट पाहतानाच घरातील मर्दानी म्हणजेच पत्नी अवतरल्याने पतीची बोलती बंद झाली. घरातील मर्दानीने पतिच्या सोबत असलेल्या गर्लफ्रेंड आणि पतीची सिनेमा हॉलमध्येच यथेच्च धुलाई केली. प्रियसीसोबत पाहून संतापलेल्या पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला ‘दबंग’ म्हणून मारहाण केली. एवढ्यावरच ती थांबली नाही तर पतीच्या प्रेयसीला घसटत सिनेमा हॉलच्या बाहेर आणले आणि पोलिसांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. हा प्रकार गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका सिनेमा हॉलमध्ये घडला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पती, पत्नी आणि पतीची प्रेयसीला पोलीस ठाण्यात नेले. मात्र, नातेसंबंधात फसवणूक हा गुन्हा नसल्याने पोलीस देखील असहाय्य झाले आणि त्या त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले. नवरंगपुरा पोलिसांनी सांगितले की, ‘दबंग’ बनलेल्या पत्नीला तिच्या मित्राने नवरा ‘मर्दानी-2’ हा चित्रपट पाहत आहे. त्यावर तिने शांत प्रतिक्रिया दिली. नवरा चित्रपट पाहत आहे यात काय मोठी गोष्ट आहे. मात्र, मित्राने पती दुसऱ्या महिलेसोबत चित्रपट पाहत असल्याचे सांगताच शांत असलेली पत्नी ‘दबंग’ बनली.

पत्नीला आपला पती दुसऱ्या महिलेसोबत चित्रपट पाहण्यास गेल्याचे पटले नाही. तिने थेट सिनेमा हॉल गाठत तेथील सुरक्षा यंत्रणेला धमकावत जबरदस्तीने आत प्रवेश केला. तिने पतीला दुसऱ्या बाईसोबत रोमांस करताना रंगेहाथ पकडले. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी प्रेयसीने त्याला ठार मारण्यापासून रोखले. तेव्हा पत्नीने तिचे देखील केस खेचत तिला मारहाण केली.

पोलिसांनी सांगितले की, पतीला ‘दबंग -3’ हा चित्रपट पहायचा होता. मात्र, या चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने आणि ‘मर्दानी-2’ या चित्रपटाला जास्त गर्दी नसल्याने त्याने मर्दानी-2 चित्रपटाची तिकीटे काढली. गर्दी कमी असल्यामुळे ते दोघे लगेच पत्नीच्या नजरेस पडले. नात्यात फसवणुकीचा गुन्हा होत नसल्याने तिघांना गुन्हा दाखल न करताच समजावून सोडून दिले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/