Coronavirus : भारतात ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’चा धोका नाही, WHO नं दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचे उमगस्थान असलेल्या चीनमधून संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. भारतात देखील कोरोना व्हायरसने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतातील दाट लोकवस्तीमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्टीकरण दिले आहे. भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याचा कोणताही धोका नाही. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना विषाणूबाबत जो अहवाल तयार करण्यात आला होता त्यामध्ये थोडीशी चूक झाली आणि भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याचा धोका असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यांनी हे स्पष्ट करत म्हटले की, भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनचा कोणताही धोका नाही मात्र भारतात क्लस्टर ऑफ केसची प्रकरणे वाढत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्टीकरण देताना असेही म्हटले आहे की, भारतातील काही भागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याला क्लस्टर ऑफ केस असे म्हटले जाते. या अहवालात चुकून कम्युनिटी ट्रान्समिशनचा उल्लेख करण्यात आला. यामुळे भारतात कोरोनाबाबत भीती निर्माण झाली. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आल्यानंतर भारताने याचा विरोध करत सांगितले की अद्याप भारतात कोरोना विषाणूचा तिसरा टप्पा अद्याप पोहचलेला नाही.
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारतात कोरोना विषाणूची 6412 प्रकरणे आहेत. ज्यामध्ये 199 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार गेल्या 24 तासात 33 लोकांचा मृत्यू झाला झाला आहे. तज्ज्ञांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा परिणाम आहे. ज्यामुळे भारतात कोरोना व्हायरस वेगाने पसरू शकला नाही.

 

एवढेच नाही तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही शुक्रवारी झालेल्या बैठकीत म्हटले आहे की, भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका अद्याप उद्भवलेला नाही. त्यांनी सांगितले की, सुमारे 600 जिल्ह्यांपैकी 400 जिल्हे कोरोनामुळे बाधित झालेले नाहीत. तसेच 133 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून त्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच योग्य त्या उपाय योजनेची कामे केली जात आहेत.