आता ‘या’ राज्यात रूग्णसेवा करा अन् 5000 मिळवा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावर लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलेे नाही. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अनेक राज्यांमध्ये वापर केला जात आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन विविध राज्य सरकारांमार्फत केले जात आहे. कर्नाटक राज्य सरकारने प्लाझ्मा दान करणार्‍यांना बक्षीस म्हणून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसमधून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन कर्नाटक सरकारने केले आहे. त्यांना सरकार 5000 रुपयांचा निधी देणार आहे. मेडिकल शिक्षा मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की राज्यात आतापर्यंत 17 हजार 390 जण बरे झाले आहेत. ज्यापैकी 4 हजार 992 रुग्ण बंगळुरुचे आहेत. त्यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.कोरोना व्हायरसविरोधातील लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. त्याआधी रुग्णाना वाचविण्यासाठी कर्नाटक सरकारने योजना राबविली आहे.