पाकिस्तानी बस ड्रायव्हरचा मुलगा झाला ब्रिटनचा अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लंडनचे माजी महापौर आणि माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची निवड झाली आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काल आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. यामध्ये त्यानी एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात पाकिस्तानी वंशाच्या साजिद जाविद यांचा देखील समावेश केला आहे. साजिद जाविद यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहमंत्रालयाचा कारभार सांभाळला होता.

जावीद हे २०१० मध्ये सर्वात पहिल्यांदा संसदेवर निवडून गेले होते. इतक्या मोठ्या पदावर पोहोचणारे साजिद जाविद हे पहिले पाकिस्तानी वंशाचे राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १९६९ मध्ये ब्रिटनमधील रॉकडेल टाउनमध्ये झाला. साजिद यांचा परिवार आधी पाकिस्तानमध्ये राहत होता. त्यानंतर त्यांचे वडील इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचे वडील बस चालवत असत.

साजिद जाविद याची ओळख

१)साजिद जाविद यांचा जन्म पाकिस्तानी कुटुंबात झाला.

२)त्यांचा जन्म ब्रिटनमधील रॉकडेल टाउनमध्ये झाला.

३) थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहमंत्रालयाचा कारभार सांभाळला होता.

४)वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी ५०० पाउंड इतकी रक्कम शेयर बाजारात गुंतवली होती.

५)ब्रिस्टलमध्ये त्यांचे संपूर्ण शिक्षण झाले.

वडील चालवत असत बस

आपल्या कुटुंबाविषयी बोलताना त्यांनी सांगितले होते कि, माझे वडील पाकिस्तानमधील अतिशय छोट्या गावात वाढले. त्यानंतर वयाच्या केवळ १७ व्या वर्षी ते रोजगारासाठी इंग्लंडला स्थलांतरित झाले. सुरुवातीला ते कपड्यांच्या कारखान्यात काम करत असत. मात्र नंतर त्यांनी बस चालवण्याचे काम सुरु केले.

आरोग्यविषयक वृत्त