माजलगांव : पालिकेतील अपहार प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण ?

माजलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नगर पालिकेमध्ये मागील तीन वर्षांपासुन अपहार प्रकरण राज्यभर गाजत आहे. तत्कालिन तीनही मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांविरूध्द फसवणुक व अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणाचा मास्टरमाईंड असणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर मात्र कसलीच कारवाई झाली नाही. पोलिसांच्या मिलीभगत मुळे याप्रकरणात मुख्य सुत्रधाराला बगल देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कचरू खळगे यांनी केला आहे.

येथील नगर पालिकेमध्ये अपहार प्रकरणी मागील पंधरा दिवसांपूर्वी तत्कालिन मुख्याधिकारी बी. सी. गावित यांचेविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज चार कोटी 13 लाख 97 हजार 942 रूपयांच्या अपहार प्रकरणी शहर पोलिसात तत्कालिन मुख्याधिकारी बी. सी. गावित, लक्ष्मण राठोड व हरिकल्याण येलगट्टे यांचेसह चार लेखापालांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वास्तविक पाहता नगर पालिका प्रशासनातील कामकाज हे केवळ मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमतावर झाले नसुन यास नगराध्यक्ष व नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक यास पुर्णतः जबाबदार असुन त्यांचे संगनमतानेच मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकिस आलेले आहेत. असे असताना देखील प्रशासन जाणीवपूर्वक मुख्य सुत्रधार असणाऱ्यास अभय देत आहेत. तसेच पोलिस प्रशासन या प्रकरणात वेळकाढूपणा दाखवत आहे जर अशाच पध्दतीने प्रशासन मुग गिळुन गप्प बसले तर ज्यांनी या प्रकरणात मुख्य भुमिका निभावलेली आहे. त्यांना अभय मिळेल म्हणुन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कचरू खळगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/