इंदापूरात ‘राष्ट्रवादी’ नविन चेहर्‍याला संधी देणार का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी २०१९ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर तालुक्यातुन इच्छुकांची गर्दी वाढल्याने राष्ट्रवादीपूढे मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षातील इच्छुकांची गर्दी व गर्दीतुन निर्माण होणारी नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार असल्याने राष्ट्रवादीकडून इंदापूर तालुक्यात शिरूर लोकसभा पॅटर्न राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून नविन चेहर्‍याला संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असुन त्यासाठी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे व पूणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादीकडून खरोखर नविन चेहर्‍याला संधी मिळाल्यास तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याने आगामी इंदापूर विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत. याबाबत तालुक्यात तर्क- वितर्काच्या चर्चेला मोठे उधाण आले असुन इच्छुकांची मोर्चेबांधणी मात्र जोरात सुरू असल्याचे दिसुन येत आहे.

इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेतृत्व म्हनूण आप्पासाहेब जगदाळे यांची ओळख आहे. ते जीजामाता शिक्षण संस्था सराटी, संस्थापक अध्यक्ष, पूणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ते इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असा त्यांचा राजकीय प्रवासाचा चढता आलेख असुन तालुक्यातील राजकीय स्थितीची पुरेपुर जाण असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कृषि प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, नवनविन योजना राबविणे, सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यत त्याचा दांडगा जनसंपर्क असल्याने विधानसभा निवडणूकीसाठी ते इच्छुक आहेत.

प्रविण माने हे इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील राजकीय पटलावरील युवक नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत. सोनाई दुध संघाचे सर्वेसर्वा, सोनाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, ते पूणे जिल्हा परिषद सदस्य, पूणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती, असा त्यांचा राजकीय प्रवास असुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन व सोनाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन आरोग्यविषयक वेगवेगळी शिबीरे राबवून हजारो रूग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, मोफत ऑपेरेशन सुविधा उपलब्ध करून देणे, तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जनावरांना चारा छावण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, सामुदायीक विवाह सोहळे राबवुन गोरगरीबांच्या मुला-मुलींचे विवाह मोफत लावुन देणे असे अनेक उपक्रम राबवून प्रविण माने यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली असल्याने विधानसभा निवडणूकीसाठी प्रविण माने यांचेही नाव चर्चेत आघाडीवर आसुन राष्ट्रवादी यावेळी नविन नेतृृृत्वाला संधी देणार का..? याबाबत चर्चेला उधान आले असुन आगामी इंदापूर विधानसभा चांगलीच गाजणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like