COVID-19 India News : जाणून घ्या, का आवश्यक आहे कोविड-19 लसीकरण आणि किती काळ कायम राहिल इम्युनिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्यासाठी जगभरात लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. भारतात 8.31 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशावेळी लोकांना जाणून घ्यायचे आहे की ही लस किती काळापर्यंत कोरोनाविरूद्ध प्रभावी राहिल. कोविड-19 ची लस घेणे किती आवश्यक आहे आणि तिच्या प्रभावाच्या कालावधी बाबत शास्त्रज्ञ काय म्हणतात, ते जाणून घेवूयात…

व्हॅक्सीन आपल्या शरीरात कोविड-19 विरूद्ध इम्युनिटीच्या विकासात मदत करते. ती आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरात अँटीबॉडी विकसित करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक व्हॅक्सीन तर कोरोना व्हायरसच्या ब्रिटन आणि दक्षिण अफ्रीकी व्हेरिएंटच्या विरूद्ध सुद्धा प्रभावी आहेत.

अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने चार हजार आरोग्य कर्मचार्‍यांना आणि फ्रंट लाईन वर्करच्या लसीकरणानंतर प्रभावाचा अभ्यास केला. यामध्ये आढळले की, फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाची व्हॅक्सीन 80 टक्केपर्यंत प्रभावी आहे, तर दुसर्‍या डोसनंतर तिचा प्रभाव 90 टक्के होतो. तर सीरमचे म्हणणे आहे की, कोविशील्ड व्हॅक्सीन जर दोन-तीन महिन्याच्या अंतराने दिली गेली तर ती 90 टक्केपर्यंत प्रभावी ठरू शकते. कोव्हॅक्सीन सुद्धा 90-59 टक्के परिणामकारक मानली जात आहे.

किती महत्वाचे आहे लस घेणे
कोविड-19 चा धोका ज्येष्ठांसह तरूणांना सुद्धा आहे. यासाठी, सर्व लोकांनी कोविड व्हॅक्सीन आवश्यक घेतली पाहिजे. मात्र, कोरोना संसर्गाचा ट्रेंड आणि व्हॅक्सीनची उपलब्धता पहाता सध्या 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. अभ्यासात आढळले आहे की, 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक कोरोना संसर्गाप्रति अपेक्षेपेक्षा जास्त संवेदनशील असतात. यासाठी, हे आवश्यक आहे की, या वयोगटाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीन आवश्य घ्यावी.

कधीपर्यंत राहतो प्रभाव
फायजर-बायोएनटेकच्या व्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीत आढळले होते की, ती सहा महिन्यापर्यंत लोकांना व्हायरसपासून वाचवू शकते. काही व्हॅक्सीनचा परिणाम सहा महिन्यापासून वर्षभर मानला जात आहे.