‘या’ 5 कारणांमुळं पुण्यातील लॉकडाऊन वाढवला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन होईल असे जाहीर केले हेते. यापूर्वी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन 12 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे 13 जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधिच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाऊन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे.

लॉकडाऊन वाढण्याची 5 कारणं
1. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत
2. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही.
3. काही लोक मास्क न घालता फिरताना दिसत आहेत.
4. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या वाढली.
5. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत नसल्याच चित्र आहे.

या पाच कारणांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत देण्यात आले होते. आता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. देशात अनलॉक सुरु असताना दुसरीकडे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाऊन पुन्हा करावा लागतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 हजारांच्या जवळ पोहचली आहे. तर आतापर्यंत 900 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजारांच्या जवळपास गेली आहे. दोन्ही शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.