पतीच्या खिशात लिपस्टिक सापडल्यानंतर महिलेच्या समोर आलं भयानक ‘वास्तव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील कार्डिफ शहरात एक विचित्र घटना समोर आली असून येथील एका महिलेला एक दिवस आपल्या पतीच्या खिशात लिपस्टिक आढळून आली. यामुळे आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध असल्याचा संशय आला. मात्र खरी माहिती समोर आल्यानंतर या महिलेच्या पायाखालील जमीन सरकली.

यानंतर महिलेने पतीकडे चौकशी केली असता पतीने देखील कोणतीही माहिती न लपवता सर्व खरे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला महिला बनण्याची इच्छा असून यासाठी त्याला सेक्स चेंज सर्जरी करायची आहे. 37 वर्षीय केली आणि तिचा 38 वर्षीय पती वॉरेन यांचा 11 वर्षांपूर्वी विवाह झाला असून या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मात्र याआधी तिला आपल्या नवऱ्याच्या वागण्याचा कधीही संशय आला नाही. त्यानंतर आता या महिलेने आपल्या पतीच्या स्त्री असण्याचा स्वीकार केला असून आपल्या पतीला ती या शस्त्रक्रियेत मदत देखील करणार आहे. त्याचबरोबर पतीच्या लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर देखील ती त्याचबरोबरच राहणार आहे.

दरम्यान, यानंतर ते दोघे पुन्हा समलैंगिक जोडीदार म्हणून लग्न करणार आहेत. त्याचबरोबर तिचा पती महिला म्हणून अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या